सध्या सगळीकडे एकाच चिंता दिसते, ह्या देशाच काही खर नाही, अगदी नुकतंच जन्माला आलेल मुल देखील काही दिवसात हि चिंता व्यक्त करायला लागतंय.
मान्य आहे आपल्या देशासमोर खूप समस्या आवासून उभ्या आहेत. भ्रष्टाचार, आतंकवाद, गरिबी, जातीयवाद इत्यादी...
पण एक खूप सोप्पं समीकरण आहे हे सगळ बदलायचं, मी बदललो तर देश बदलेल.
सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतः पासून करावी.
मी सिग्नल तोडेल, मी लाच देईल, मी donation देईल, मी मतदानाच्या दिवशी ट्रीप ला जाईल, मी सगळ्या चुका छोट्या का असेना करेन पण देश, राजकारणी मात्र बदलले पाहिजे, किती चुकीची अपेक्षा आहे.
मी म्हणजेच देश, त्यामुळे सुरुवात माझ्या पासूनच केली पाहिजे हे जर प्रत्येकाने लक्ष्यात घेतलं तर सगळे प्रश्न अगदी सहज सुटतील.
सुधारणेचा आपला प्राधान्य क्रम मी, माझे घर, माझा परिसर, ....., माझा देश असा असला तर बदल घडवण खूप सोप्पं आहे. पण आपण सुरुवातच देश बदलण्यापासून करतो अन मग आपल्याला लक्ष्य खूप कठीण वाटत अन आपण त्याचा पाठलाग सोडून देतो.
बऱ्याचदा आपल्या प्राधान्यक्रमात देश नसतोच, असते ते मी, माझे घर अन माझी जात, संपलं. जात आली कि सगळ संपत. जात ही वैयक्तिक बाब आहे हे आपण विसरतो अन ती सार्वजनिक करून प्रश्न सोडवण्या ऐवजी वाढवून ठेवतो.
शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो त्यात एका ओळीत म्हटलंय, माझा देश अन माझे देशबांधव यांच्याशी एकनिष्ठ राहीन अन त्यांच्या समृद्धीत माझे सौख्य सामावले आहे, आपण त्यात 'माझी जात अन माझे जातबांधव' असा बदल केलाय असं तर नाही ना?
मला वाटतंय वेळ आली आहे ती प्रतिज्ञा पुन्हा घेण्याची किबहुना स्मरण करण्याची.
चलातर मग, सुरुवात स्वतः पासून करूया देश आपोआप बदलेल.
-विशाल पाठक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा