गुरुवार, १० जानेवारी, २०१३

लोलक

'खुपते तिथे गुप्ते' मध्ये सलिल ने एकवलेली 'शांता शेळके' यांची कविता :

देवळाच्या झुम्बरातुन सापडलेला लोलक
हरवला माझ्या हातुन
आणि दिसू लागली पुन्हा
माणसं माणसासारखी
पुन्हा दिसू लागलं
गवत हिरवं आणि
आभाळ दिसू लागलं पुन्हा नीळ…
परवा खूप खूप वर्षांनी
एक चिमुरडी धावत आली माझ्याकडे
आणि म्हणाली,
`आजी तुला माहिती आहे’
गवत नसतं नुसतं हिरवं
आणि आभाळ नसतं नुसतं नीळ
आणि माणसं असतात
इंद्रधनुष्याची बनलेली
माझा लोलक हिला कुठे बरं सापडला?
त्या देवळातल्या झुम्बराला
अजून असे किती लोलक आहेत
कुणास ठाऊक??

खरच किती सुंदर न वास्तव आहे ना , आपण सगळेच तो लोलक हरवून बसलो आहोत अस वाटत. सोंदर्यदृष्टी देणारा लोलक जो जन्माला येताना आपण सगळेच घेऊन आलो होतो, पण धावण्याच्या नादात तो हरवून बसलो, किवा त्याचा वापर विसरलो. 
निखळ सौंदर्य, निरागस प्रेम, प्रामाणिकपणा हे सगळ आजही जगात आहे पण बर्याचदा ते आपल्याला दिसत नाही कारण आपण तो लोलक हरवून बसलोय. अन मग आपण त्या प्रेमात स्वार्थ शोधतो, सौंदर्यात कृत्रिमता शोधतो अन जगण्यातला आनंद गमावून बसतो.
आपल्या सगळ्यां मध्ये ना एक लहान मुल दडलेलं असत, त्याच्या हातात कदाचित हा लोलक असावा. लहान मुलांना नाही का कुठल्या हि गोष्टीचं हसू येत. बर्याचदा आपल्याला प्रश्न पडतो कि यात हसण्या सारख काय आहे, अन मग आपली बुद्धी वापरून निष्कर्ष काढतो कि ते विनाकारण हसतात, पण तसं नसतं त्यांचा लोलक त्यांच्याच कडे असतो अन आपला मात्र हरवला असतो. जग खूप सुंदर आहे पण ते सौंदर्य बघायची दृष्टी मात्र पाहिजे.

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

प्रतिज्ञा

सध्या सगळीकडे एकाच चिंता दिसते, ह्या देशाच काही खर नाही, अगदी नुकतंच जन्माला आलेल मुल देखील काही दिवसात हि चिंता व्यक्त करायला लागतंय.
मान्य आहे आपल्या देशासमोर खूप समस्या आवासून उभ्या आहेत. भ्रष्टाचार, आतंकवाद, गरिबी, जातीयवाद इत्यादी...

पण एक खूप सोप्पं समीकरण आहे हे सगळ बदलायचं, मी बदललो तर देश बदलेल.
सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतः पासून करावी.
मी सिग्नल तोडेल, मी लाच देईल, मी donation देईल, मी मतदानाच्या दिवशी ट्रीप ला जाईल, मी सगळ्या चुका छोट्या का असेना करेन पण देश, राजकारणी मात्र बदलले पाहिजे, किती चुकीची अपेक्षा आहे.
मी म्हणजेच देश, त्यामुळे सुरुवात माझ्या पासूनच केली पाहिजे हे जर प्रत्येकाने लक्ष्यात घेतलं तर सगळे प्रश्न अगदी सहज सुटतील.

सुधारणेचा आपला प्राधान्य क्रम मी, माझे घर, माझा परिसर, ....., माझा देश असा असला तर बदल घडवण खूप सोप्पं आहे. पण आपण सुरुवातच देश बदलण्यापासून करतो अन मग आपल्याला लक्ष्य खूप कठीण वाटत अन आपण त्याचा पाठलाग सोडून देतो.

बऱ्याचदा आपल्या प्राधान्यक्रमात देश नसतोच, असते ते मी, माझे घर अन माझी जात, संपलं. जात आली कि सगळ संपत. जात ही वैयक्तिक बाब आहे हे आपण विसरतो अन ती सार्वजनिक करून प्रश्न सोडवण्या ऐवजी वाढवून ठेवतो.

शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो त्यात एका ओळीत म्हटलंय, माझा देश अन माझे देशबांधव यांच्याशी एकनिष्ठ राहीन अन त्यांच्या समृद्धीत माझे सौख्य सामावले आहे, आपण त्यात 'माझी जात अन माझे जातबांधव'  असा बदल केलाय असं तर नाही ना?

मला वाटतंय वेळ आली आहे ती प्रतिज्ञा पुन्हा घेण्याची किबहुना स्मरण करण्याची.
चलातर मग, सुरुवात स्वतः पासून करूया देश आपोआप बदलेल.

-विशाल पाठक

बुधवार, २५ जुलै, २०१२

कोण जाणे...

रोप  लावले  अंगणात 
म्हणे  निवडुंगाची  जात 
फुले  कमळ  कसे  त्यास 
कोण जाणे...

जन्म एकाच उदरी 
हात, पाय, धड शिरी 
कसे होई श्रेष्ठ, शुद्र 
कोण जाणे...

मूर्ती बैसली गाभारी 
असो दगडी वा पितळी
देव वसे कसा त्यात 
कोण जाणे...

ईश्वर वसे रे अंतरी 
सर्व सृष्टी चराचरी 
का पूजती राउळी
कोण जाणे...

- विशाल पाठक

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

किसीने कुछ बनाया था। किसीने कुछ बनाया है।

किसीने कुछ बनाया था। किसीने कुछ बनाया है।
कही मंदिर की परछाई। कही मस्जिद का साया है।

ना तब पुछा था हमसे। ना अब पुछने आए है।
हमेशा फैसले करके। हमे युही सुनाया है।

किसीने कुछ बनाया था। किसीने कुछ बनाया है।

हमे फुरसत कहाँ। रोटी की गोलाई की चक्करसे।
न जाने किसका मंदिर है। न जाने किसकी मस्जिद है।

न जाने कौन उलझाता है। सिधे सच्चे धागो को।
न जाने किसकी साजिश है। न जाने किसकी यह जिद है।
अजिब सा सिलसिला है। न जाने किसने यह चलाया है।

किसीने कुछ बनाया था। किसीने कुछ बनाया है।

वो कहते है तुम्हारा है। जरा तुम एक नजर डालो।
वो कहते है बढो,माँगो। जरूरी है, न तुम टालो।

मगर अपनी जरूरत है। बिल्कुल अलग इससे।
जरा ठहरो, जरा सोचो। हमे साचों मे मत ढालो।
बताओ कौन यह शोला। मेरे आँगन मे लाया है।

किसीने कुछ बनाया था, किसीने कुछ बनाया है

अगर हिंदू में आँधी है। अगर तुफान मुसलमान है।
तो आओ आँधी तुफान यार बनके। कुछ नया कर दिखाए।

तो आओ, एक नजर डालो।अहं से सवालो पर।
कई कोने अंधेरे है। मशालो को दिया कर दे।
अब असली दर्द बोलेंगे। जो सिनो मे छुपाया है।

किसीने कुछ बनाया था। किसीने कुछ बनाया है।

 - प्रसुन जोशी

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

!!!......आज.....!!!

 

आज देखणेपणावर जाऊ नका,सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

श्रीमंताला भुलू नका,'आलेल्या ' पैशाला 'जाण्याच्या' वाटा पटकन सापडतात .
जी व्यक्ती तुमच्या चेहर्‍यावर हास्य फुलवू शकते,तीच तुमच्या आयुष्याला
अर्थ देऊ शकते.

***********************

प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं,तरी तुमच्या स्वप्नाचा ध्यास सोडू
नका.करावीशी वाटेल, ती प्रत्येक गोष्ट करून पाहा.जिथे जावंसं वाटेल ,तिथे
जा . आयुष्य एकदाच मिळतं .आणि संधीही पुन्हापुन्हा येत नसते.

*********************

कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं;पण मी आज जे करेन त्यावर माझा
उद्या आकाराला येईल, हे मला समजलं आहे.

*********************

आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन, कारण हा दिवस
माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही, हे मला ठाऊक आहे.

*********************

आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल. उद्याचा
सुर्योदय मी पाहीनच याची काय खात्री ?

*********************

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक काम पुर्ण करीन, निदान एक अडथळा
ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन .

*********************

आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन. आणि आकाशात नजर लावून तिथे
चमकणारी माझ्या स्वप्नाची नक्षत्रं डोळे भरून पाहीन .


आज निदान एवढं तरी मी करीनच.!


    Small Experts Exchange VIP Badge